एमएसआरडीसी, एएसआयच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री पाहणी; अतिक्रमण व वाहतूक व्यवस्थापनाचाही आढावा
गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. १८ :
मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल रात्री प्रत्यक्ष पाहणी केली. एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या कामांना गती देऊन ती येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश हे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. जिल्हाधिकारी पंडा यांनी मार्कंडा परिसरातील कामांची सद्यस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीची माहिती घेतली.
एमएसआरडीसीच्या अखत्यारित सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना प्रलंबित कामांचे योग्य नियोजन करून त्यांना आवश्यक गती द्यावी आणि निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. विशेषतः एमएसआरडीसीची कामे डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास न्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मार्कंडा देवस्थान परिसरातील कामांना गती देण्याचे निर्देश
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत मार्कंडा परिसरात सुरू असलेल्या कामांचीही जिल्हाधिकारी पंडा यांनी पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामांची सद्यस्थिती आणि प्रगतीची माहिती घेतली.
दरम्यान, परिसरातील अतिक्रमणाच्या अनुषंगाने संबंधित नागरिकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा, तसेच नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्थेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मार्कंडा परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाबाबतही जिल्हाधिकारी पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी चर्चा केली. परिसरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना दिल्या.
मार्कंडा परिसरातील विविध कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी दिले.
जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी प्रशासनाची सकारात्मक भूमिका – InfoNewsUpdate24
- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
- गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
- गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
- गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
- आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
४०१ अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी; उपस्थितीवर प्रशासनाची थेट नजर गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. २० ऑगस्ट :…
गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न…
गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
अतिरिक्त तुकडी, नवीन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी गडचिरोली, दि. १९…
गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :गडचिरोली विधानसभा…
आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९…
मानेवारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करा; ग्रामपंचायतीची मागणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोष आढळल्यास शिक्षकावर कारवाई करून तात्काळ नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी…

