मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत
एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९ ऑगस्ट :
तालुक्यातील अतिदुर्गम वाघेझरी येथील शिवसेनेचे बीएलए प्रमुख मनोज देवू कोवासे (वय ३२) यांचे दि. ५ जुलै रोजी आकस्मिक निधन झाले. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कोवासे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाघेझरी येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांना धीर देत आर्थिक मदतही करण्यात आली.
शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, विदर्भ विभागीय संपर्क प्रमुख आमदार मनीषाताई कायंदे आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या आदेशानुसार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली.
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, अक्षय पुंगाटी, वैद्यकीय मदत कक्ष अहेरी विधानसभा प्रमुख प्रकाश भाऊ गद्दलवार, अरुण शेडमाके आणि अंकुश मंडलवार यांनी वाघेझरी येथे जाऊन मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात पक्षाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असा संदेश शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मनोज कोवासे हे शिवसेनेचे सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. अतिदुर्गम भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. त्यांच्या अकाली निधनाने कोवासे कुटुंबीयांसह शिवसेना पक्षाचीही मोठी हानी झाली असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दुःखाच्या या प्रसंगी शिवसेना कोवासे कुटुंबीयांच्या पाठीशी सदैव उभी राहील, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी एटापल्ली नगरपंचायतीचे नगरसेवक नामदेव हिचामी, नगरसेवक राघव सुलवावार, गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास उसेंडी, विश्वनाथ जांभूकर, प्रशांत तलांडे, गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू आत्राम, नत्तू दुर्वा, रिषभ दुर्गे, महादेव हिरा, मिरवा मट्टामी, सुमित कर्माकर, सचिन गेडाम, सुरेश तलांडे, अमर बिश्वास, वैभव सोमणकर, आदित्य चिपावार आदी उपस्थित होते.
Click Here For More Info
- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
- गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
- गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
- गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
- आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
४०१ अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी; उपस्थितीवर प्रशासनाची थेट नजर गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. २० ऑगस्ट :…
गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न…
गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
अतिरिक्त तुकडी, नवीन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी गडचिरोली, दि. १९…
गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :गडचिरोली विधानसभा…
आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९…
मानेवारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करा; ग्रामपंचायतीची मागणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोष आढळल्यास शिक्षकावर कारवाई करून तात्काळ नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी…

