४०१ अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी; उपस्थितीवर प्रशासनाची थेट नजर
गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. २० ऑगस्ट : ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती अधिक पारदर्शक करण्यासाठी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ४०१ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी या प्रणालीद्वारे नोंदविली जाणार असून, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात पत्र जारी केले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक तसेच जीपीएस हजेरी प्रणाली सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी ग्रामविकास विभागाने १० डिसेंबर २०२४ रोजीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक आणि जीपीएस हजेरी प्रणाली राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्याने पुन्हा स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी होणार
नवीन प्रणालीमुळे ग्रामपंचायत अधिकारी नेमक्या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही, याची नोंद प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हजेरी व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्याबरोबरच कार्यालयीन कामकाजात शिस्त आणण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात ४५९ ग्रामपंचायती
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५९ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची ४७३ पदे मंजूर असून त्यापैकी ४०१ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत, तर ७२ पदे रिक्त आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. अधिकारी नियमितपणे कार्यालयात उपलब्ध राहिल्यास नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होते.
जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद उपलब्ध होऊन नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
- गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
- गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
- गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
- आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
४०१ अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी; उपस्थितीवर प्रशासनाची थेट नजर गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. २० ऑगस्ट :…
गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न…
गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
अतिरिक्त तुकडी, नवीन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी गडचिरोली, दि. १९…
गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :गडचिरोली विधानसभा…
आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९…
मानेवारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करा; ग्रामपंचायतीची मागणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोष आढळल्यास शिक्षकावर कारवाई करून तात्काळ नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी…

