बांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा

बांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा; शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या – आमदार रामदासजी मसराम

बांधकाम कामगारांसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश; आमदार रामदासजी मसराम यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
देसाईगंज | प्रतिनिधी | Info News Update 24

देसाईगंज, दि. २० जुलै : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने पंचायत समिती, देसाईगंज येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात आमदार रामदासजी मसराम यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

बैठकीत आमदार मसराम यांनी जिल्ह्यातील पात्र बांधकाम कामगारांची शंभर टक्के ऑनलाइन नोंदणी करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

त्यांनी सांगितले की, बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केलेल्या प्रत्येक पात्र कामगाराची नोंदणी करून त्यांना शिक्षण, आरोग्य, प्रसूती सहाय्य, सुरक्षा साहित्य, घरकुल, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, विवाह सहाय्य, पेन्शन, अपघात विमा तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे कार्य करावे.

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की दगड फोडणे व कापणे, लादी-टाईल्स कापणे व पॉलिश करणे, सुतारकाम, रंगकाम, गटार व नळजोडणी, विद्युत वायरिंग, अग्निशमन यंत्रणा, वातानुकूलित प्रणाली, लिफ्ट बसविणे, लोखंडी ग्रिल, जलसंचयन संरचना, अंतर्गत सजावटीची कामे, काचकाम, सौर ऊर्जा उपकरणे, मॉड्युलर किचन, सिमेंट काँक्रिट उत्पादने, जलतरण तलाव, सार्वजनिक उद्याने, पदपथ, बसथांबे, कारंजे तसेच इमारत आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध कामांमध्ये कार्यरत असलेले कामगार मंडळाच्या योजनांसाठी पात्र आहेत.

सरकारी बांधकाम विभागाचे अधिकारी कुलदीप भोलाने यांना निर्देश देताना आमदार मसराम यांनी प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर जनजागृती मोहीम राबवून कामगारांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले. नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून कोणताही पात्र बांधकाम कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस गटविकास अधिकारी रविंद्र भाबड (देसाईगंज), राजेश फाये (कोरची), धीरज पाटील (कुरखेडा), मंगेश आरेवार (आरमोरी), सरकारी बांधकाम विभागाचे लिपिक कांबळे, परशुराम ठाकरे तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे संबंधित तालुक्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

बांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा

निरोगी गडचिरोली साठी डॉक्टरांनी एकत्र यावे; आरोग्य उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

InfoNewsUpdate24 Telegram

    FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Exit mobile version