aple sarkar seva kendra advertisement cancelled gadchiroli 2026

गडचिरोलीतील ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठीची जाहिरात रद्द; नव्या शासन शुद्धीपत्रकानुसार पुढील प्रक्रिया

११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठीची जाहिरात रद्द; नव्या सूचनांनुसार होणार पुढील कार्यवाही
९ जुलैच्या शासन शुद्धीपत्रकानंतर निर्णय; इच्छुकांनी नव्या अधिकृत जाहिरातीकडे लक्ष ठेवावे
गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २१ जुलै :  गडचिरोली जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत२ नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने ९ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार सेवा केंद्र मंजुरी प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारित शासन निर्देशांनुसार पुढील कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी नव्या अधिकृत जाहिरात व शासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

aple sarkar seva kendra advertisement cancelled gadchiroli 2026

बांधकाम कामगारांची १०० टक्के नोंदणी करा; शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या – आमदार रामदासजी मसराम – InfoNewsUpdate24

InfoNewsUpdate24 Telegram

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version