gadchiroli kendriya vidyalaya admission 2026

गडचिरोली केंद्रीय विद्यालयात इयत्ता १ ते ५ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू; ३० जुलैपर्यंत ऑफलाइन अर्ज

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24

गडचिरोली, दि. २१ जुलै : गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते पाचवी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र पालकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह विहित कालावधीत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

विद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत विद्यालयाच्या कार्यालयात केवळ ऑफलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रवेश अर्ज विद्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.

विद्यालय हे निवासी (Residential) नसून, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत ये-जा करून शिक्षण घ्यावे लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

प्रवेशासाठी ३१ मार्च २०२६ रोजीच्या वयानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, प्रवेश प्रक्रिया केंद्रीय विद्यालय संघटनेच्या (KVS) नियमावलीनुसार राबविण्यात येणार आहे. तसेच RTE, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), ओबीसी (NCL), दिव्यांग तसेच एकुलती एक मुलगी या प्रवर्गांसाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या तरतुदींचे पालन करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, रिक्त जागांचा तपशील आणि मार्गदर्शक सूचना विद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत लिंक तसेच सूचना फलकावर पाहता येतील. अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांनी केंद्रीय विद्यालय, सेमना बायपास, आनंदनगर, गडचिरोली येथे संपर्क साधावा किंवा ०७१३२-२२३०२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

gadchiroli kendriya vidyalaya admission 2026

राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ अभियान राबविणार; ५ सप्टेंबरपासून विशेष मोहिमेची सुरुवात – InfoNewsUpdate24

InfoNewsUpdate24 Telegram

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version