गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २१ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन लक्षवेध’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राज्यातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी कुस्ती आणि रोईंग (Rowing) या खेळांच्या निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा प्रशिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, स्पर्धांचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन, करिअर मार्गदर्शन तसेच देशी-विदेशी संस्थांच्या सहकार्याद्वारे खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन लक्षवेध योजना राबविण्यात येत आहे. विभागीय क्रीडा निपुणता केंद्र हे निवासी (Residential) स्वरूपाचे असून निवड झालेल्या खेळाडूंना विशेष प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
रोईंग (Rowing) निवड चाचणी
- दिनांक: २२ जुलै २०२६
- वेळ: सकाळी ९.०० वाजता
- स्थळ: क्रीडा संकुल, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, पुणे
- अधिक माहिती: श्री. संदीप भापकर (रोईंग प्रशिक्षक)
- मो.: ९८२२२३५५७७
कुस्ती निवड चाचणी
- दिनांक: २४ जुलै २०२६
- वेळ: सकाळी ९.०० वाजता
- स्थळ: ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव-नीरा-बारामती रोड
- अधिक माहिती:
- श्री. शेलार (क्रीडा शिक्षक) – ९०७५१०७१२१
- श्री. रणवरे (क्रीडा शिक्षक) – ९४२३२४०२८०
खेळाडूंनी सोबत आणावयाची मूळ कागदपत्रे
- जन्मदाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे
- शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
खेळाडूंनी निवास व भोजनाची व्यवस्था स्वतः करायची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पात्र खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप
- काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश
- मिशन लक्षवेध अंतर्गत कुस्ती व रोईंग खेळाडूंसाठी निवड चाचणी; २२ व २४ जुलै रोजी पुण्यात आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान; २२ जुलै रोजी गडचिरोलीत मुख्य कार्यक्रम
