etapalli talukyat vishesh adhar nondani

एटापल्ली तालुक्यात विशेष आधार नोंदणी व अपडेट मोहीम; १४ जुलै ते ७ ऑगस्टदरम्यान गावागावांत शिबिरांचे आयोजन

एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24

एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थी, लहान मुले तसेच सर्व नागरिकांना आधार नोंदणी आणि आधार अपडेटची सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्यासाठी तहसील प्रशासनाच्या वतीने १४ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विशेष आधार नोंदणी व अपडेट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मोहीम तहसीलदार, एटापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक तसेच आधार सेवा केंद्रांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. सर्व शिबिरे दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात येतील.

शिबिरांचे वेळापत्रक

  • १४ जुलै २०२६ – ग्रामपंचायत हालेवारा
  • १६ जुलै २०२६ – ग्रामपंचायत गेदा, येमली व जवेली (खुर्द)
  • १७ जुलै २०२६ – ग्रामपंचायत गर्देवाडा, जांबिया व बुर्गी
  • २१ जुलै २०२६ – ग्रामपंचायत गट्टा, उडेरा व मेंढरी
  • २३ जुलै २०२६ – ग्रामपंचायत चोखेवाडा, सोहगाव व वाघेझरी
  • २७ जुलै २०२६ – ग्रामपंचायत जवेली (बु.), तोडसा व सरखेड़ा
  • २९ जुलै २०२६ – ग्रामपंचायत जारावंडी, कोटमी व कसनसूर
  • ३१ जुलै २०२६ – ग्रामपंचायत कोंदोळी, कोहका व मानेवारा

याशिवाय, उर्वरित गावांमध्ये ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत नियोजित कार्यक्रमानुसार शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

कोणत्या सेवा मिळणार?

या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत:

  • नवीन आधार नोंदणी
  • ५ व १५ वर्षांवरील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट
  • नाव, पत्ता व जन्मतारीख दुरुस्ती
  • मोबाईल क्रमांक अपडेट
  • इतर आवश्यक आधार माहितीतील दुरुस्ती

नागरिकांना आवाहन

तहसील प्रशासनाने सर्व विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना आपल्या गावातील नियोजित तारखेला आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून आधार नोंदणी किंवा आधार अपडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे.

दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आधारविषयक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, त्यामुळे शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

click here

CheckAadhaarStatus

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *