गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी आणि शासकीय सेवेत संधी मिळावी, या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने मोफत स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणामध्ये एमपीएससी, जिल्हा निवड समितीमार्फत होणाऱ्या विविध पदभरती, IBPS तसेच SSC परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने असून, प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक पात्र प्रशिक्षणार्थ्याला दरमहा ₹1,000 विद्यावेतन दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना चार पुस्तकांचा संच आणि प्रशिक्षण पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पात्रता
- गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवार
- शालांत (दहावी) परीक्षा उत्तीर्ण
- वैध रोजगार नोंदणी कार्ड असणे आवश्यक
अर्ज प्रक्रिया
या प्रशिक्षणासाठीचे अर्ज संबंधित कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी 1 जुलै 2026 ते 28 जुलै 2026 या कालावधीत अर्ज सादर करावेत.
मुलाखतीची तारीख
पात्र उमेदवारांची मुलाखत 29 जुलै 2026 रोजी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल, बॅरेक क्रमांक 2, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 8485814488 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

