खासदार-डॉ.-नामदेव-किरसान-यांच्या-वाढदिवसानिमित्त

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त ५,००० विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै :गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ५,००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ज्ञानवृद्धी आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले, पुस्तक हे ज्ञानाचे अमूल्य साधन आहे. अभ्यासाला कधीही कंटाळू नका. आज मिळवलेले ज्ञानच भविष्यात तुमच्या यशाचा पाया ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.”

कार्यक्रमाला आमदार अभिजीत वंजारी, आमदार रामदास मसराम, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, शंकरराव सालोडकर, प्रभाकर वासेकर, समशेर खान पठाण, माधव गावड, अजय लोंढे, परसराम टिकले, नगरसेवक रमेश चौधरी, पराग पोरेड्डीवार, श्रीकांत देशमुख, नगरसेविका मेघा वरगंटीवार, मनीषा खेवले, नगरसेवक नंदू कायरकर, सुनील चटगुलवार, मिलिंद खोब्रागडे, राजेंद्र बुल्ले, प्रशांत कोराम, मनोज अग्रवाल, प्रमोद भगत, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, हरबाजी मोरे, नीतीन राऊत, दिलीप घोडाम यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.

याच कार्यक्रमात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत २५ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

खासदार-डॉ.-नामदेव-किरसान-यांच्या-वाढदिवसानिमित्त

InfoNewsUpdate24 Telegram

एटापल्ली तालुक्यातील सूरजागड परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद; वन विभाग सतर्क – InfoNewsUpdate24

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *