११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठीची जाहिरात रद्द; नव्या सूचनांनुसार होणार पुढील कार्यवाही
९ जुलैच्या शासन शुद्धीपत्रकानंतर निर्णय; इच्छुकांनी नव्या अधिकृत जाहिरातीकडे लक्ष ठेवावे
गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २१ जुलै : गडचिरोली जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व २ नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने ९ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन शुद्धीपत्रकानुसार सेवा केंद्र मंजुरी प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी १० जुलै २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधारित शासन निर्देशांनुसार पुढील कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी नव्या अधिकृत जाहिरात व शासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
