एटापल्ली-etapalli-road-blocked-tree-fall-ambulance

एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी

एटापल्ली | प्रतिनिधी | Info News Update 24

एटापल्ली, दि. २२ जुलै :    गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात अलेंगा टोला गावानंतर ताडपल्ली–एटापल्ली फाटा मार्गावर मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे एटापल्लीकडे येणारी रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) रस्त्यातच अडकून पडली असून, रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सततच्या पावसामुळे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांसह अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने घटनास्थळी पथक पाठवून रस्त्यावर पडलेले झाड हटवावे, अशी मागणी केली आहे. झाड हटवून रस्ता त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, जेणेकरून रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांची ये-जा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्ता पूर्ववत सुरू करावा आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एटापल्ली-etapalli-road-blocked-tree-fall-ambulance

डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ – InfoNewsUpdate24

GADCHIROLI DISTRICT

MAHARASTHRA GOVERNMENT

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version