आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांनी मंत्रालयात राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन गडचिरोलीतील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव

आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी

गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासह कायदा-सुव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद रामजी नारोटे यांनी मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले.

गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागाची वाढती व्याप्ती आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे तातडीने मंजूर करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रभावी पोलीस सेवा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र ग्रामीण पोलीस ठाणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. वाढती व्याप्ती लक्षात घेऊन या मागणीवर तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली.

शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी

जिल्ह्यातील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयांमधील स्वयं अर्थसहाय्य तत्त्वावरील पदे तातडीने नियमित करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदे भरावीत आणि नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

वीर जवानांच्या स्मृतीसाठी भव्य शहीद स्मारक

नक्षलवादी हल्ल्यांमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अधिकारी आणि जवानांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, यासाठी गडचिरोली जिल्ह्यात भव्य शहीद स्मारक उभारण्यात यावे, असा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच निवेदनातील मागण्या लवकर मार्गी लागाव्यात यासाठी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे डॉ. मिलिंद नारोटे यांनी सांगितले.

Click Here For More Info

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांत्वनपर भेट – InfoNewsUpdate24

आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांनी मंत्रालयात राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन गडचिरोलीतील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव

आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न…

Read More
गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांबाबत मिलिंद नारोटे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली.

गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट

अतिरिक्त तुकडी, नवीन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी गडचिरोली, दि. १९…

Read More
आमदार डॉ. मिलिंद नरोटे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत वनविषयक प्रश्नांवर चर्चा करताना

गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट

मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :गडचिरोली विधानसभा…

Read More
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेली सांत्वनपर भेट

आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९…

Read More
मानेवारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन

मानेवारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करा; ग्रामपंचायतीची मागणी

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोष आढळल्यास शिक्षकावर कारवाई करून तात्काळ नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी…

Read More

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *