अहेरी | प्रतिनिधी | Info News Update 24
अहेरी, दि. २१ जुलै : अहेरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा आलापल्ली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सलीम शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला.
हा पक्षप्रवेश माजी पंचायत समिती सदस्य श्री. हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सलीम शेख यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष श्री. लक्ष्मण येररावार, ज्येष्ठ कार्यकर्ते इरफान पठाण, येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, मख्नुर भाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

- गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप
- काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश
- मिशन लक्षवेध अंतर्गत कुस्ती व रोईंग खेळाडूंसाठी निवड चाचणी; २२ व २४ जुलै रोजी पुण्यात आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान; २२ जुलै रोजी गडचिरोलीत मुख्य कार्यक्रम
