गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २१ जुलै : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयान्वये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान गडचिरोली विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश नागरिकांना विविध शासकीय महसूल सेवा आणि सुविधा गतिमान व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे.
महसूल विभागाच्या गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महसूल क्षेत्रीय कार्यालयामार्फत विविध महसूलविषयक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या अभियानाचा मुख्य कार्यक्रम २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरात गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील नागरिक सहभागी होऊ शकतात.
ही माहिती नोडल अधिकारी तथा तहसीलदार, गडचिरोली यांनी दिली आहे.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
