आरसेटी boi rseti gadchiroli photography

बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीतर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत निवासी प्रशिक्षण

गडचिरोली, प्रतिनिधी : बँक ऑफ इंडिया आरसेटी (RSETI) गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या विषयावरील ३१ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३० जून २०२६ ते ३० जुलै २०२६ असा असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये कॅमेरा हाताळणी, लेन्सचा वापर, प्रकाश नियोजन, व्हिडिओ शूटिंग, संपादन (Editing), आकर्षक व्हिडिओ निर्मिती तसेच प्रत्यक्ष फोटो व व्हिडिओ शूटचा अनुभव दिला जाणार आहे. अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :

  • ३१ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण
  • मोफत निवास, चहा, नाश्ता व भोजन
  • तज्ज्ञांचे मार्गदर्शन
  • प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व अनुभव
  • केंद्र शासनमान्य प्रमाणपत्र
  • अभ्यास दौरा व बाजार सर्वेक्षण

पात्रता :

  • वय १८ ते ५० वर्षे
  • गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती

ऑनलाइन अर्ज करा :

येथे ऑनलाइन अर्ज करा

अर्ज भरल्यानंतर संस्थेकडून निवडलेल्या प्रशिक्षणाबाबत संपर्क साधला जाईल. अर्जामध्ये “फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी” हा पर्याय निवडावा.

अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 9404188239 / 8698758509 / 07132-295040

आरसेटी गडचिरोली

जिल्ह्यातील युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्रात करिअर घडवावे, असे आवाहन बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.

आरसेटी boi rseti gadchiroli photography

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *