गडचिरोली, प्रतिनिधी : बँक ऑफ इंडिया आरसेटी (RSETI) गडचिरोली यांच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर (मेकअप अँड हेअर स्टाईल) या विषयावरील ६ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा कालावधी ३० जून २०२६ ते ५ जुलै २०२६ असा असून इच्छुक महिलांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये मेकअप, हेअर स्टाईलिंग, ब्रायडल मेकअप, ब्युटी पार्लर व्यवस्थापन, ग्राहक सेवा तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्राथमिक ज्ञान व कौशल्य प्राप्त होणार आहे.
प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये
- ६ दिवसांचे मोफत निवासी प्रशिक्षण
- मोफत निवास, चहा, नाश्ता व भोजन
- प्रशिक्षित व तज्ज्ञ मार्गदर्शक
- केंद्र शासनमान्य प्रमाणपत्र
- अभ्यास दौरा व बाजार सर्वेक्षण
- स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- टीसी / मार्कशीट
- रेशन कार्ड
- ४ पासपोर्ट साईज फोटो
- बीपीएल प्रमाणपत्र / मनरेगा जॉब कार्ड
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
पात्रता
- वय : १८ ते ५० वर्षे
- इच्छुक महिला उमेदवार
फक्त ३० जागा उपलब्ध आहेत.
QR Code स्कॅन करून किंवा वरील लिंकवर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करता येईल.
इच्छुक उमेदवारांनी ३० जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आवश्यक कागदपत्रांसह बँक ऑफ इंडिया आरसेटी, गडचिरोली येथे उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
📞 9404188239
📞 8698758509
RSETI GADCHIROLI
ब्युटी पार्लर व मेकअप क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही एक उत्तम संधी असून जिल्ह्यातील महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोलीतर्फे करण्यात आले आहे.

