गडचिरोली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सन २०२६ पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा राज्यातील अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्णयामागील उद्देश म्हणजे अजित पवार यांनी सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची अधिकृत दखल घेणे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, ग्रामीण विकास, शिक्षण, क्रीडा तसेच लोककल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे.
या निर्णयामुळे २२ जुलै हा दिवस राज्यभर शासकीय स्तरावर स्मरणदिन म्हणून पाळला जाणार असून, संबंधित कार्यालयांमध्ये नियमानुसार अभिवादन कार्यक्रम आयोजित केले जातील.
राजकीय आणि सामाजिक स्तरावर या निर्णयाची चर्चा सुरू असून विविध स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनाच्या अधिकृत आदेशानुसार पुढील वर्षापासून हा निर्णय अमलात येणार आहे.

