गडचिरोली steel hub

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी १७ जुलैला जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक; “STEEL HUB” रोडमॅपवर होणार चर्चा

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि भविष्यात जिल्ह्याला STEEL HUB ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग मित्र समिती व इतर समन्वय समितीची संयुक्त बैठक शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक विकास, स्थानिक उद्योगांना चालना, नवउद्योजकांना मार्गदर्शन तसेच रोजगारनिर्मिती यासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

उद्योगवाढीसाठी तयार होणार रोडमॅप

गडचिरोलीमध्ये उभारणी होत असलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योगांना पूरक संधी निर्माण करणे, ॲन्सिलरी (Ancillary) उद्योगांचा विकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे यावर बैठकीत विशेष भर दिला जाणार आहे.

उद्योजकांच्या अडचणींवर होणार चर्चा

बैठकीत उद्योजकांच्या अडी-अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, बँक कर्ज सुविधा, औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी आणि विविध विभागांच्या समन्वयातून उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे विषय

बैठकीत पुढील मुद्द्यांवर विशेष चर्चा होणार आहे:

  • जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्या व उपाययोजना
  • ॲन्सिलरी डेव्हलपमेंट रोडमॅप
  • ॲडव्हान्टेज विदर्भ अभियान अंतर्गत औद्योगिक संधी
  • आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन
  • स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती
  • जिल्हा निर्यात प्रचालन समितीचा आढावा
  • भविष्यातील औद्योगिक विकासाचे नियोजन

जिल्ह्यातील सर्व उद्योजक, उद्योग क्षेत्राशी संबंधित संस्था, नवउद्योजक आणि संबंधित घटकांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना व समस्या मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

गडचिरोली steel hub

जारावंडी व सेवारी ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी; तातडीच्या कारवाईसाठी मनीष दुर्गे  यांचे प्रशासनाला निवेदन – InfoNewsUpdate24

MIDC Maharashtra Industrial Development Corporation

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *