एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून

एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक

एटापल्ली | प्रतिनिधी | दि. 25 जुलै 2026
एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी अल्पावधीत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 12 जुलै 2026 रोजी पिपली बुर्गीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फाट्याजवळ गावाच्या दिशादर्शक फलकाखाली लाल रंगाचा कापडी बॅनर आढळून आला. त्याच परिसरात दगडाखाली तसेच बाजूला दोन पांढऱ्या रंगाची पत्रकेही सापडली.

सदर बॅनर व पत्रकांवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल, असा मजकूर लिहिण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशानुसार विशेष तपास पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे संबंधित आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणात दि. 14 जुलै 2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी येथे अप. क्र. 01/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 353(1)(ब), 189(2), 190, 61(2) तसेच बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) कलम 10, 13, 20, 39 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत असून, या कृत्यामागील इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून

Official Website: www.infonewsupdate24.com

Click here Facebook Page :

Click here Instagram page :

गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण – InfoNewsUpdate24

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *