अहेरीत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती ची स्थापना

अहेरीत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांना नवी गती

अहेरी | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
अहेरी, दि. १७ जुलै :  अहेरी विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भूषविले.

समितीच्या माध्यमातून आरोग्य विभागासह विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यासोबतच आरोग्य संस्थांचे नियमित मूल्यमापन, आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढविणे आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी समिती कार्य करणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागाला प्राधान्य

अहेरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, जलद आणि परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

पारदर्शक आणि उत्तरदायी आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प

आरोग्य सेवा अधिक उत्तरदायी, पारदर्शक आणि जनकेंद्रित करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अहेरीत एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती ची स्थापना

आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल; ता. आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण – InfoNewsUpdate24

InfoNewsUpdate24 Telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *