आलापल्ली येथे डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

वनहक्कधारकांना न्याय मिळणार! आलापल्लीत आढावा बैठकीत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

आलापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
आलापल्ली (प्रतिनिधी) दि. २० जुलै : वनहक्कधारकांना शासन निर्णयाचा लाभ वेळेत मिळावा आणि त्यांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आलापल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागातील अधिकारी तसेच महसूल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून पात्र वनहक्कधारकांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदी आणि त्यासंबंधित सर्व प्रशासकीय प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी सांगितले की, वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्कांचे संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वनहक्कधारक आदिवासी बांधवांपर्यंत वेळेत पोहोचविणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीत विविध प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन संबंधित विभागांमध्ये समन्वय राखत सर्व प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वनहक्कधारकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

https://www.facebook.com/share/1BZZyBDocq

आरोग्य सेवेच्या बळकटीकडे अहेरीची वाटचाल; ता. आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण – InfoNewsUpdate24

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *