आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा

चातगाव ग्रामसभेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली, दि. १७ जुलै :  गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज ग्रामपंचायत चातगाव येथे आयोजित ग्रामसभेला उपस्थित राहून गावाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला.

ग्रामसभेदरम्यान शिक्षण, आरोग्य, घरकुल योजना, सामाजिक प्रश्न, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अवैध दारू विक्री, विद्युत खांबांवरील बंद दिवे तसेच इतर स्थानिक समस्यांवर ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यापूर्वी गावभेटीदरम्यान दिलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच चातगाव व शिंगणापूर येथे जिल्हा परिषद शाळेची आवश्यकता, मागील वर्षीच्या घरकुल पंचनाम्यांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामसभा नियमितपणे होत नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला.

या सर्व विषयांवर संबंधित विभाग व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

या ग्रामसभेला चातगाव, कुडकवाही, टोला आणि कटेझरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या, अपेक्षा आणि सूचना आमदारांसमोर मांडल्या.

यावेळी सरपंच गोपालजी उईके, उपसरपंच भूमिकाताई धुळसे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, युवा नेते अविनाशजी पोरेटी, गिरीधरजी जराते, नितीनजी कोत्तावार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विकासकामांचा घेतला सविस्तर आढावा

अहेरीत ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची स्थापना; आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांना नवी गती – InfoNewsUpdate24

InfoNewsUpdate24 Telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *