स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकासाला वेग!

स्टील उत्पादन, रोजगार आणि हरित क्रांतीचा मेळ – गडचिरोलीच्या विकसाला वेग !

गडचिरोली (ता. गडचिरोली), २२ जुलै २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत गडचिरोलीच्या औद्योगिक आणि पर्यावरणीय प्रगतीची नवी दिशा ठरवणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडींना साक्षी मिळाली.

मुख्यमंत्री म्हणाले, “ग्रीन स्टील क्लस्टरच्या माध्यमातून चीनपेक्षा दर्जेदार आणि स्वस्त स्टील निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून, यामुळे 20 हजार नव्या रोजगार संधी निर्माण होतील.” सध्या लॉयड्स कंपनीत 14 हजार स्थानिक युवक-युवती कार्यरत असून, महिलांनाही ट्रक ड्रायव्हरपासून उच्च पदांपर्यंत संधी मिळत असल्याचे उदाहरण त्यांनी सांगितले.

🌿 कोटी वृक्षांची हरित क्रांती
गडचिरोलीत पुढील दोन वर्षांत एक कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय असून, त्यापैकी 40 लाख झाडांची लागवड आजपासून सुरू झाली आहे. ग्रीन ट्रान्सपोर्ट, ई-व्हेईकल्स, आणि पर्यावरणपूरक उपायांमुळे जिल्हा हरित विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय.

🚛 देशातील चौथी स्लरी पाइपलाइन गडचिरोलीत!
राज्यातील पहिली व देशातील चौथी 80 किमी लांबीची स्लरी पाइपलाइन साकारत असून, यामुळे लॉजिस्टिक खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.

🎓 शिक्षण, आरोग्य व सामाजिक भागीदारी
लॉयड्सतर्फे स्थानिकांसाठी शाळा, रुग्णालय, तसेच कामगारांना भागधारक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोंडवाना आणि कर्टिन विद्यापीठांच्या सहकार्याने मायनिंग अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गडचिरोली हा जिल्हा पुढील पाच वर्षांत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये असेल, हा माझा ठाम विश्वास आहे.”

🧑‍💼 उपस्थित मान्यवर
याप्रसंगी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, पद्मश्री श्रीमती तुलसी मुंडा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Read More>>

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top