गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २२ जुलै : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026‘ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळण्यासाठी Farmer ID नोंदणी, आधार प्रमाणीकरण आणि Agristack प्रणालीवरील नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप Farmer ID नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्रात जाऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. बँकांकडून प्राप्त कर्जमाहिती व शासनाच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांना हा लाभ मंजूर केला जाणार आहे.
योजनेनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित पीक कर्जधारक पात्र शेतकऱ्यांनाही शासनाच्या अटी व निकषांनुसार लाभ मिळू शकतो. आवश्यकतेनुसार पात्र लाभार्थ्यांना एकरकमी समझोता (OTS) योजनेचाही लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तसेच सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची नियमानुसार पूर्ण परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष परतफेडीच्या आधारे कमाल ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
कर्जमाफीसंदर्भातील तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत राहणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींचे नियमानुसार निवारण करण्यात येईल.
जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम यांनी सांगितले की, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, तहसील कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Pingback: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ए