गडचिरोली sheetaltai bholubhau somnani raincoat distribution gadchiroli

शेतमजुरांसाठी संवेदनशील उपक्रम; शितलताई-भोलूभाऊ सोमनानींकडून रेनकोट वाटप

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २३ जुलै :  धान रोवणीच्या हंगामात पावसात, चिखलात आणि प्रतिकूल हवामानात दिवसभर मेहनत करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी एक संवेदनशील सामाजिक उपक्रम राबविला. त्यांच्या हस्ते धान रोवणी करणाऱ्या शेतमजुरांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

पावसाळ्यात सतत पाण्यात व चिखलात काम करणाऱ्या शेतमजुरांना सर्दी, ताप व इतर आजारांचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन थेट शेतात जाऊन रेनकोटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे मजुरांना पावसापासून संरक्षण मिळणार असून त्यांचे काम अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

यावेळी शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी सांगितले की, शेतमजूर हे शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या श्रमामुळेच शेती बहरते. त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे.”

या उपक्रमामुळे शेतमजुरांनी आनंद व्यक्त करत शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांचे आभार मानले. तसेच स्थानिक नागरिक व शेती क्षेत्रातील जाणकारांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा लोकाभिमुख उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

शेतमजुरांचा सन्मान – समृद्ध शेतीचा पाया” हा संदेश देत राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारा ठरत आहे.

गडचिरोली sheetaltai bholubhau somnani raincoat distribution gadchiroli
गडचिरोली sheetaltai bholubhau somnani raincoat distribution gadchiroli

Official Website: www.infonewsupdate24.com

Click here Facebook Page :

Click here Instagram page :

गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण – InfoNewsUpdate24

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *