अहेरी, दि. २२ जुलै : अहेरी विधानसभा क्षेत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी शिबिराला भेट देत विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा, विविध योजनांची अंमलबजावणी तसेच लाभ वितरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, “समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे आहे.” तसेच नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विविध विभागांच्या सेवांचा एकाच ठिकाणी लाभ
या समाधान शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत राज, महिला व बालविकास, आदिवासी विकास, समाजकल्याण, शिक्षण, ग्रामविकास, वन, अन्न व नागरी पुरवठा तसेच महावितरण विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा, आवश्यक प्रमाणपत्रे, योजनांची माहिती आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले.
याशिवाय लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे, धनादेश, शेतीची अवजारे, खत आणि बियाण्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी होऊन अनेक कामे जागेवरच मार्गी लागली.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे समाधान शिबिर सर्वार्थाने यशस्वी ठरले. शासनाच्या विविध विभागांनी एकाच ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Pingback: एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी - InfoNewsUpdate24