गडचिरोली-gadchiroli sickle cell thalassemia screening camp cvs center

गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल-थॅलेसेमिया तपासणी शिबिर; लवकरच CVS तपासणी केंद्र सुरू

गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २२ जुलै :    महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर माता (ANC Mothers) तसेच सिकलसेल (SS) रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे, RMO डॉ. अमरीश तिवारी आणि अधिपरिचारिका अधिकारी श्रीमती कविता पोतराजवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. माधव शिंदे यांनी सिकलसेल रुग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच सर्व गरोदर महिलांनी गर्भावस्थेच्या पहिल्या १२ आठवड्यांत सिकलसेल व थॅलेसेमियाची तपासणी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तपासणी पॉझिटिव्ह आल्यास त्वरित CVS चाचणी करून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. छाया उईके यांनी वैद्यकीय अधिकारी, ANM, स्टाफ नर्स आणि आशा स्वयंसेविकांना सिकलसेल व थॅलेसेमियाबाबत जनजागृती आणि प्रभावी समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, गडचिरोली महिला व बाल रुग्णालयात लवकरच कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग (CVS) तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गर्भातील बाळाला सिकलसेल किंवा थॅलेसेमियाचा धोका आहे की नाही, याचे वेळेत निदान होऊन योग्य वैद्यकीय निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे.

आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात सिकलसेल व थॅलेसेमियासारख्या अनुवांशिक आजारांवर नियंत्रण मिळविण्यास आणि जनजागृती वाढविण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

गडचिरोली-gadchiroli sickle cell thalassemia screening camp cvs center

एटापल्ली येथे भरलेला नाला पार करून गर्भवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले; कसनसूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती – InfoNewsUpdate24

InfoNewsUpdate24 Telegram

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *