एटापल्ली| प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
एटापल्ली (प्रतिनिधी) दि. २२ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असतानाही आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात यश आले. ही घटना २० जुलै २०२६ रोजी कसनसूर परिसरात घडली.
कोईडुंक गावातील ३० वर्षीय गर्भवती महिलेस मध्यरात्री प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर सकाळी आशा स्वयंसेविका निर्मला नरोटे यांना याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने एएनएम वंदना मरसकोल्हे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना झाले.
मात्र मुसळधार पावसामुळे मार्गातील नाला भरल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. अशा परिस्थितीत एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांनी धाडस दाखवत गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून सुमारे एक किलोमीटर अंतर पायी नेले आणि नाला पार करून रुग्णवाहिकेपर्यंत सुरक्षित पोहोचवले.
त्यानंतर महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कसनसूर येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू करत सुरक्षित प्रसूती केली. आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असून पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले.
या संपूर्ण बचाव मोहिमेत आरोग्य विभागातील अधिकारी, एएनएम, आशा स्वयंसेविका, एमपीडब्ल्यू आणि ग्रामस्थांनी केलेल्या समन्वयामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवेची संवेदनशीलता आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Pingback: गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल-थॅलेसेमिया तपासणी शिब
Pingback: शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - InfoNewsUpdate24