निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

निकतवाडा (ता. चामोर्शी ) : सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था, निकतवाडा यांच्या वतीने शनिवार (दि. 17.01.2026) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निकतवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 118 नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. रुपाली दुधाबावारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल दहिवले, अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोट समिती होते. यावेळी संस्थाध्यक्ष गोकुळदास वाकडे यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर वर्षा शेट्टे (ग्रामपंचायत सदस्य, घोट), वर्षा नेवारे (ग्रामसंघ महिला बचत गट, निकतवाडा), प्रदीप वाकडे (सचिव, बौद्ध समाज, निकतवाडा), वनिता पोरेड्डीवार (ग्रामपंचायत सदस्य), उर्मिला पोगुलवार (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), सीताराम बारसागडे (प्रतिष्ठित नागरिक) तसेच डॉ. आशुतोष जावडेकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव प्रियंका शेंडे यांनी केले. आरोग्य हीच खरी संपत्ती असून समाजात जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सेवा दिली. डॉ. आशुतोष जावडेकर (दंत शल्य चिकित्सक), डॉ. आकरे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्रांजय हर्ष (नेत्रतज्ज्ञ, गडचिरोली) तसेच नागेश मादेशी (समुपदेशक – ICIC) व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांची तपासणी केली. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, डोळे, दंत तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरासाठी आलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ तसेच गावातील दिलीप खोब्रागडे, मुरलीधर देवातळे, खुशाल खोब्रागडे, आकांक्षा डोंगरे, स्मिता खोब्रागडे, संध्या वाकडे, जोसना खोब्रागडे, छब्बू फुलझेले, सविता खोब्रागडे व पलक वैरागडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खोब्रागडे यांनी केले, तर आभार खुशाल खोब्रागडे यांनी मानले.

निकतवाडा येथे सुशीला बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *