सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचा कुटुंबीयांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद; वाघाला जेरबंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक
एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९ ऑगस्ट :
तालुक्यातील दोलंदा येथे वाघाच्या हल्ल्यात ५७ वर्षीय हरी वड्डे यांचा मृत्यू झाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी, दि. १७ ऑगस्ट रोजी दोलंदा येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात आली.
जारावंडीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दोलंदा येथे रविवारी, दि. १६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. घराबाहेर पडले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हरी वड्डे यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यानंतर शिवसेनेची आक्रमक भूमिका
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला, अक्षय पुंगाटी, अंकुश मंडलवार, अरूण शेडमाके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोलंदा येथे भेट दिली.
पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून हरी वड्डे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांना देण्यात आली. त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वड्डे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून वाघाला तातडीने जेरबंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
वाघाच्या सततच्या वावरामुळे दोलंदा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. वाघाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी एटापल्लीचे नगरसेवक नामदेव हिचामी, नगरसेवक राघव सुलवावार, गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास उसेंडी, विश्वनाथ जांभूकर सर, प्रशांत तलांडे, गुरुपल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळू आत्राम, नत्तू दुर्वा, रिषभ दुर्गे, महादेव हिरा, मिरवा मट्टामी, सुमित कर्माकर, सचिन गेडाम, सुरेश तलांडे, अमर बिश्वास, वैभव सोमणकर, आदित्य चिपावार आदी उपस्थित होते.
Click Here For More Info
एटापल्लीत ‘हर घर तिरंगा’ आणि ‘वंदे मातरम्’ उपक्रमांचा उत्साहात समारोप – InfoNewsUpdate24
- ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
- गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
- गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
- गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
- आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची हजेरी आता बायोमेट्रिकद्वारे
४०१ अधिकाऱ्यांची जीपीएस-बायोमेट्रिक हजेरी; उपस्थितीवर प्रशासनाची थेट नजर गडचिरोली (जि. गडचिरोली), दि. २० ऑगस्ट :…
गडचिरोली ग्रामीणसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी; शहीद स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव
आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांची राज्यमंत्री पंकज भोयर यांची मंत्रालयात भेट; शिक्षण व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्न…
गडचिरोली कृषी महाविद्यालयातील प्रश्नांसाठी मिलिंद नारोटे यांची कृषिमंत्र्यांची भेट
अतिरिक्त तुकडी, नवीन अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीची मागणी गडचिरोली, दि. १९…
गडचिरोलीच्या वनविषयक प्रश्नांवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वनमंत्री गणेश नाईक यांची भेट
मानव-वन्यजीव संघर्ष, वनसंपदा संवर्धन आणि स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर चर्चा गडचिरोली, दि. १९ ऑगस्ट :गडचिरोली विधानसभा…
आकस्मिक निधन झालेल्या शिवसेना बीएलए प्रमुखाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
मनोज कोवासे यांच्या कुटुंबीयांना धीर देत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक मदत एटापल्ली (जि. गडचिरोली), दि. १९…
मानेवारा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजाची चौकशी करा; ग्रामपंचायतीची मागणी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोष आढळल्यास शिक्षकावर कारवाई करून तात्काळ नवीन शिक्षक नियुक्त करण्याची मागणी…

