cm devendra fadnavis seva mahotsav 2026 gadchiroli blood donation.webp

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत ‘सेवा महोत्सव २०२६’ ला सुरुवात

२२ ते ३० जुलैदरम्यान रक्तदान शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन; कार्यकर्त्यांना सेवा महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन
प्रतिनिधी | गडचिरोली | दि. २२ जुलै २०२६
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात ‘सेवा महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या प्रारंभी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, ज्येष्ठ नेते भारत खटी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, युवा नेते साई सिल्लमवार, प्रशांत कोटगले तसेच जिल्हा रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सेवा महोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सामाजिक उपक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन केले.

दरम्यान, ३० जुलै २०२६ रोजी मौजा घोट येथे रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्र आणि घोट-सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्राच्या वतीने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सेवा, समाजहित आणि जनकल्याण या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सेवा महोत्सवाला जिल्हाभरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

cm devendra fadnavis seva mahotsav 2026 gadchiroli blood donation.webp

Official Website: www.infonewsupdate24.com

Click here Facebook Page :

Click here Instagram page :

गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण – InfoNewsUpdate24

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version