निरोगी गडचिरोली साठी डॉक्टरांनी एकत्र यावे

निरोगी गडचिरोली साठी डॉक्टरांनी एकत्र यावे; आरोग्य उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य – आमदार डॉ. मिलिंद नरोटे

गडचिरोली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
गडचिरोली (प्रतिनिधी) दि. २० जुलै : गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आर.के. सेलिब्रेशन, गडचिरोली येथे आयोजित डॉक्टर्स कोलॅबोरेशन’डॉक्टर्स डे’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉ. कन्ना मडावी यांचा सन्मानचिन्ह आणि भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची प्रत देऊन विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय जिल्ह्याच्या विविध भागांतून उपस्थित राहिलेल्या आदिवासी डॉक्टरांनी स्वतःचा परिचय करून देत आरोग्य क्षेत्रातील अनुभव मांडले. सर्व डॉक्टरांचा यथोचित सन्मानही करण्यात आला.

यावेळी उपस्थित डॉक्टरांना संबोधित करताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, आज आपण सर्व डॉक्टर एका छताखाली एकत्र आलो आहोत. ही एकजूट कायम ठेवत पुढील तीन महिन्यांनी पुन्हा अशाच प्रकारे एकत्र येऊया. गडचिरोलीच्या दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य शिबिरे आणि विविध आरोग्य उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे. डॉक्टरांनी यासाठी ठोस आराखडा तयार करावा. शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”

त्यांनी पुढे सांगितले की, समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी शासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असून, निरोगी, सशक्त आणि आरोग्यसंपन्न गडचिरोली घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाला भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, चंद्रपूर जीएमसीचे डॉ. गजेंद्र सुरपाम, मुंबईचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, डॉ. पुरुषोत्तम मडावी, सीआरपीएफ कमांडंट डॉ. वसंत कुमरे, डॉ. मिलिंदकुमार कुमरे, डॉ. छाया उईके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. सचिन मडावी, डॉ. सुनील मडावी, डॉ. चेतन कोवे, डॉ. नितीन मसराम, डॉ. उमेश सिडाम, डॉ. प्रियंका शेडमाके, डॉ. सोनल कोवे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. प्रवीण किलनाके, डॉ. तारकेश्वर उईके तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी केले. उपस्थितांनी या ऐतिहासिक उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

निरोगी गडचिरोली साठी डॉक्टरांनी एकत्र यावे

InfoNewsUpdate24 Telegram

गडचिरोलीत ३५ वर्षांपासून प्रलंबित आदिवासी गोटूल भूमीच्या प्रश्नाला न्याय; १ हेक्टर जागा मंजूर, ४० लाखांच्या सभागृहाला निधी

FacebookWhatsAppGmailMessengerTelegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version