कुरखेडा | प्रतिनिधी | Info News Update 24
कुरखेडा, दि. २४ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दल (BSF) चे जवान सुरेश कुडू आंबाडर (वय ३५) यांनी देशसेवा करताना सर्वोच्च बलिदान दिले. पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना २३ जुलै २०२६ रोजी त्यांना वीरमरण आले. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान जवान सुरेश आंबाडर कर्तव्यावर तैनात होते. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान त्यांनी शौर्याने लढत देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
गृह मंत्रालयाकडून या घटनेची माहिती राज्य प्रशासनाला देण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. त्यांचे पार्थिव आज सायंकाळपर्यंत मूळ गावी आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
शहीद सुरेश आंबाडर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुरेश यांनी कठोर परिश्रम करून बीएसएफमध्ये भरती होत देशसेवेचे स्वप्न साकार केले होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत, “देशाच्या रक्षणासाठी दिलेले हे सर्वोच्च बलिदान कधीही विसरले जाणार नाही,” अशी भावना व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
जय हिंद!

Official Website: www.infonewsupdate24.com
- एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केली अटक
- गडचिरोलीचा सुपुत्र शहीद; भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना बीएसएफ जवान सुरेश आंबाडर यांचे वीरमरण
- गडचिरोलीत सबसिडीच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा गोरखधंदा? शेतकऱ्यांची फसवणुकीची तक्रार; दोषींवर कारवाईची डॉ. देवराव होळी यांची मागणी
- मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
- आरमोरीत बारदाना निर्मिती उद्योगाचे उद्घाटन; महिला सक्षमीकरणासाठी शाश्वत रोजगार क्लस्टर उभारणीवर भर
